१० कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर
रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठीचा १९० कोटी जमा आणि १८० कोटी खर्चाचा, असा १० कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्पाला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली. अंतिम मंजूरीसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ केलेली नाही. परंतु पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उतारे आणि दाखल्यांच्या शुल्कामध्ये काही प्रमाणात वाढ केली आहे.
राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी सार्वत्रिक निवडणुका लांबल्या आहेत. परिणामी दीड वर्षे झाली पालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्र प्रशासक सादर करणार आहे. साधारण १९० कोटीचा जमेचा आणि १८० कोटी खर्चाचे असे हे १० कोटी शिलकी अंदाजपत्र आहे. पालिका प्रशासनाने हे अंदजापत्र मंजुल केले आहे. कोणतीही करवाढ नसली तरी गतवर्षीचे दायित्व मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम दिसणार आहे.
गेल्या वर्षी रत्नागिरी पालिकेने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 180 कोटी 44 लाख 89 हजार जमेचे तर 180 कोटी 18 लाख 95 हजार खर्चाचे असे 25 लाख 93 हजार शिलकीच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली होती. कोविडचे सावट आणि घरपट्टी, पाणीपट्टी, करवसुलीवर झालेल्या विपरित परिणामानंतरही कोणतीही करवाढ नसणारे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. काही त्रुटी विरोधकांनी दाखवून दिल्या. त्यामध्ये सुधारणा करून ते अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आले होते.
गेल्या वर्षीचा निधी शंभर टक्के खर्च पडला असून, अतिरिक्त कामाचा आर्थिक भार पालिका प्रशासनावर पडला आहे. अंदाजपत्रकातील तरतुदीचा विचार न करता झालेल्या वारेमाप विकासकामांमुळे सुमारे ३५ ते ४० कोटी इतके पालिकेला इतरांचे देणे द्यायचे आहे. या अंदजापत्रकात कोणतीही करवाढ नसली तरी पालिकेने उत्पन्नवाढीसाठी दाखले आणि उताऱ्यांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे.