रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयीरीतीने बेपत्ता असलेले रत्नागिरीचे कापड व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ पश्चिम बंगालमधील कोलकात्यात सुखरूप आढळले आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.
दरम्यान, त्यांनी एका एटीएममधून पैसे काढल्यानंतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांचे लोकेशन कोलकात्यात ट्रेस करण्यात आले. पोलिसांच्या व स्थानिक लोकांच्या मदतीने ते सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्याने कुटुंबीय आणि व्यापारी वर्गाचा जीव भांड्यात पडला आहे. ते कोलकात्याला जाण्यामागचे नेमके कारण लवकरच समोर येईल.









