रत्नागिरी:- बिपरजॉय वादळ कोकण किनारपट्टी वरून पुढे सरकले असेल तरी या वादळाचे पडसाद अद्यापही दिसून येत आहेत. रत्नागिरी शहरात वादळी वारे वाहत असून शहरातील जयस्तंभ येथे झाड थेट गाडीवर कोसळून नुकसान झाले.
बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव सध्या कोकण किनारपट्टीसह रत्नागिरीत जाणवायला लागला आहे. तसेच आजूबाजूच्या भागात देखील त्यांचा परिणाम आता पाहायला मिळत आहे. सध्या रत्नागिरीमध्ये सोसाट्याचा वारा सुटला असून या वाऱ्यामुळे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ परिसरात जुनाट वृक्षाची फांदी तुटून गाडीवर पडली आहे आणि गाडीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे .बिपरजॉय वादळ जरी गुजरातकडे निघून गेले असले तरी देखील त्याचे परिणाम हे कोकणासह रत्नागिरीत दिसून येत आहेत. तसेच शहराच्या इतर भगतही झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत…