रत्नागिरीत कार्तिकी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी

रत्नागिरी:- शहरातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिर्की एकादशी साजरी करण्यात आली. पहाटे २.३०  वाजता श्री विठ्ठलाची विधीवत पूजा पार पडली. यावेळी विठुरायाचा जयघोष करण्यात आला.

यंदा पूजेचा मान संतोष कुलापकर व सवी कुलापकर या जोडप्याला मिळाला. त्यानंतर पहाटे ४.३० वाजता काकड आरती करण्यात आली.  संपूर्ण दिवसभर भजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडले.

कार्तिकी एकादशी निमित्त रत्नागिरीतील ऐतिहासिक श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात येणाऱ्या भाविकांना आज केवळ मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरात फार गर्दी झाली नाही. येणाऱ्या भाविकांनी रांगेत राहून दर्शनाचा लाभ घेतला.