रत्नागिरी शहराला चोवीस तास पाणी पुरवठा करण्याबाबत रनपकडून नियोजन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरवासीयांना 24 तास पाणीपुरवठा करण्याची माजी नगराध्यक्ष मिलींद कीर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मागणी करण्यात आली होती. नवीनच टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठय़ाच्या लाईनच्या माध्यमातून रत्नागिरी नगर नगरपरिषद प्रायोगिक तत्त्वावर पावसाळ्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या संदर्भात नियोजन करण्यात येत आहे.

रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला आहे. शुक्रवारी या संदर्भात मुख्याधिकारी बाबर, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भोसले, उपाध्यक्ष सानिफ गव्हाणकर, सईद पावसकर, बबन आंबेकर, मकबूल म्हाद्रे उपस्थित होते. त्यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर यांयाकडे या प्रश्नी पुन्हा मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर भोईर, जितेंद्र विचारे हे देखील यावेळी उपस्थित होते.

न.प. ची सुधारीत नळपाणी योजना ही 24 तास जनतेला पाणी देण्याचे नियोजन केलेले असताना लोकांना अद्याप 24 तास पाणी देण्यात आले नाही ही दुर्दैवी बाब आहे. गेल्या वर्षीही आपण मागणी केली होती, तसे निवेदनही प्रशासनाला दिलेले असल्यो मिलींद कीर यांनी सांगितले. त्यामुळे शहरात असलेल्या 14 झोनप्रमाणे पावसाळ्यामध्ये 24 तास पाणी जनतेला देण्याचे सुचीत केले होते. आपण त्याला मान्यताही दर्शविली होती. जनतेला 24 तास पाणी देण्यापासून वंचित ठेवले आहे. तरी या वर्षी पावसाळयामध्ये 24 तास जनतेला पाणी द्यावे जेणेकरुन पाण्याची बचत होईल असे कीर यांनी मागणी केली.

पानवल धरणाचे 1300 मीटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन योजनेच्या नियोजनाप्रमाणे पावसाळयामध्ये शिळ धरणाचे पाणी स्टोअर करुन पानवल धरणाचे पाणी पावसाळयामध्ये वापरावे व सहकार्य करावे असेही यापूर्वी दिलेल्या निवेदनानुसार मागणी केलेली आहे. या झालेल्या बैठकीवेळी शहरवासियांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरात लवकर नियोजन केले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी बाबर यांनी दिले आहे.

रत्नागिरी शहरवासीयांना लवकरच प्रायोगिक तत्त्वावर होणार 24 तास पाणीपुरवठा.नवीनच टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या लाईनच्या माध्यमातून रत्नागिरी नगर नगरपरिषद प्रायोगिक तत्त्वावर पावसाळ्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या संदर्भात नियोजन करत आहे,रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला आहे.आज या संदर्भात मुख्याधिकारी बाबर ,पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर भोईर, जितेंद्र विचारे यांच्याबरोबर बैठक पर पडली व कर्मचारी वर्गाचे, पाणीपुरवठ्यासंदर्भात पूर्ण नियोजन करून ह्या पावसाळ्यात शहरवासियांना 24 तास पाणी पुराविण्यात येईल असेसांगण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर ,शहराध्यक्ष निलेश भोसले, उपाध्यक्ष सानिफ गव्हाणकर,सईद पावसकर, बबन आंबेकर,मकबूल म्हाद्रे उपस्थीत होते.