रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर व प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण बसप्पा जोशी (२२, रा. कारवांचीवाडी, रवींद्रनगर, रत्नागिरी), मुस्तकी मनुरुद्दीन गडकरी (वय२२, रा. राजिवडा, रत्नागिरी), रोहित अशोक भुटीया उर्फ रोहीत विजय वाघेला (वय २०, रा. राजिवडा पुलाखाली, रत्नागिरी) अशी संशयित मद्यपी तरुणांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी सात ते साडे आठच्या सुमारास मारुतीमंदिर, प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीनही तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे.









