रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण नाका ते गोखलेनाका जाणार्या रस्त्यावर रहादारीस अडथळा निर्माण करणार्या चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.20 वा.करण्यात आली.
अजय रघुनाथ लिंगायत (33, रा.मु.पो.परचुरी लिंगायतवाडी संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल राकेश बागुल यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी संशयित चालकाने त्याच्या ताब्यातील टाटाचा छोटा टेम्पो (एमएच-08-डब्ल्यू-3119) ही राधाकृष्ण नाका ते गोखले नाका जाणार्या रस्त्यावरील गणेश वस्त्र निकेत दुकानाच्या समोर उभा केला होता. त्यामुळे इतर रहादारीला अडथळा निर्माण झाल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.