रत्नागिरी:- मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरासह लगतच्या गावात देखील मद्यपीं सार्वजनिक ठिकाणच्या आडोशाचा आधार घेऊन तहान भागवत असल्याचे चित्र आहे. यामध्ये तरुणांचाही समावेश आहे. सोमवारी चक्क एकाच दिवशी मिरजोळेधार, प्रमोद महाजन क्रिडा संकूल, जलतरण तलाव-साळवी स्टॉप, भाट्ये या ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला.
प्रशांत जगन्नाथ पंड्ये (४२, रा. पंड्येवाडी, मिरजोळे-रत्नागिरी), मिलींद शंकर पांचाळ (४५, रा. सागर निनाद अपार्टमेंट, झाडगाव, परटवणे, रत्नागिरी), मायकल मुकेश भोपाळकर (३९, छत्रपतीनगर, नाचणे), मदन रामचंद्र गवाळकर (२, शांतीनगर, रसाळवाडी- रत्नागिरी), सुरज प्रकाश पंडीत (२५, विनम्रनगर, नाचणे, गोडाऊन स्टॉप-रत्नागिरी), ऋतिक दिलीप मयेकर (२५, रा. नाचणे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. १९) दुपारी एक ते रात्री आठच्या सुमारास विविध ठिकाणी निदर्शनास आल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित देशी विदेशी मद्य सार्वजनिक ठिकाणी प्राशन करताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









