रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी व साळवीस्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन जणांविरुद्ध ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश शिवराम पवार (वय ५८, रा. साठरेबांबर, ठोंबरेवाडी, रत्नागिरी), विजय राजाराम वाडकर (वय ४५, रा. मधलीवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) व आकाश मोहन गोसावी (वय २९, रा. तांदुळवाडी नवीन वसाहत सांगली, सध्या रा. घुडेवठार झोपडपट्टी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी अकरात ते सायंकाळी सव्वासातच्या सुमारास निदर्शनास आल्या
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीनही संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे, लक्ष्मण कोकरे व महिला पोलिस हवालदार ईशिता वाडावे यांनी ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या. तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









