रत्नागिरी:- शहरातील पोस्ट ऑफिस ते गोखले नाका रस्त्यावर बंद टपरीच्या आडोशाला विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ४८८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्वप्नील सुदाम वायंगणकर (वय ५०, रा. आंबेशेत-वायंगणकरवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २०) सायंकाळी सातच्या सुमारास गोखले नाका येथील बंद टपरीच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित वायंगणकर हे विनापरवाना मटका जुगार चालवत असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावली आहे.