रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत पहिल्या दिवशी चार अर्ज मागे

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घ्यायच्या पहिल्या दिवशी चार जणांनी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी सांगितले.

रनपच्या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आतापर्यंत तिघांनी अर्ज मागे घेतले आहेत. प्रभाग 5 ब मधून मंजुळा विजय कदम, प्रभाग 4 ब मधून रोहन दिनेश वरेकर, प्रभाग 4 ब मधून वक्रतुंड उमेश शेट्ये आणि प्रभाग 9 अ मधून शुभम रमेश सोळंकी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर किती उमेदवार रिंगणात राहणार आणि कुणाकुणाच्यात लढत होणार हे स्पष्ट होणार आहे