रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३-ब मधून युवा आणि धडाकेबाज उमेदवार म्हणून उभे असलेल्या मतीन बावानी यांना मतदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभागात सुरू असलेल्या त्यांच्या जनसंपर्क मोहिमेला विशेष प्रतिसाद लाभत आहे.
स्थानिक पातळीवर वेळोवेळी काम करणारे, अडचणीत लोकांना मदत करण्यासाठी तत्पर राहणारे आणि सदैव संपर्कात राहणारे उमेदवार म्हणून मतीन बावानी यांची छाप प्रभागात आधीच निर्माण झाली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत ते मजबूत दावेदार म्हणून उदयास आले आहेत.
प्रभागातील नागरिकांना या वेळी नवीन चेहरा आणि बदल अपेक्षित असल्याने बावानी यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः तरुण मतदारांचा विश्वास आणि महिलांचा प्रतिसाद पाहता प्रभाग ३-ब मधील निवडणूक अधिक रंगतदार होत आहे.
नागरिकांनी व्यक्त केलेला सकारात्मक प्रतिसाद आणि जनसंपर्कदरम्यान दिसलेला उत्साह पाहता, मतीन बावानी हे या प्रभागात उमेदवारीची लक्षणीय ताकद दाखवत आहेत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.









