रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदी विनीत चौधरी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या बदली नंतर रिक्त झालेल्या पदावर विनीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलिस स्थानकाचा पदभार पाहणाऱ्या पोलीस निरीक्षक यांची बढतीने नवी मुंबई येथील पोलिस उप अधीक्षक पदावर बदली झाली होती.

रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांची नुकतीच बदली झाली होती. या जागी विनीत चौधरी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. विनीत चौधरी मागील तीन वर्षांपासून शहर पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांना बढती मिळाली आणि त्यांची नियुक्ती नवी मुंबई पोलीस उप निरीक्षक पदावर करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या हाती रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.