रत्नागिरी:-रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सला शिखर सावरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार दि. २२ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९ व्या जयंती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने शौर्य, विज्ञान आणि शिखर सावरकर पुरस्कार वितरण समारंभ झाला.
महाराष्ट्रात गिर्यारोहन संस्था आणि गिर्यारोहणातील साहसावर आधारीत समाजकार्याची मोठी पंरपरा आहे. अशाच सेवाभावी गिर्यारोहण संस्थापैकी एक प्रमुख नाव रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिली अधिकृत गिर्यारोहन संस्था असून पूर, अपघात अशा दूर्दैवी आणि आपत्कालीन प्रसंगी या संस्थेचे गेल्या २५ वर्षातील कार्य म्हणजे साहसाबरोबरच सामाजिक कर्तव्याची जाण होऊन उभारलेला एक आदर्शच म्हणावा लागेल. उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था म्हणून रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सला शिखर सावकरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान आमदार मा. अतूल भातखळकर , वींग कमांडर निलेश डेखणे, स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे अध्यक्ष मा. प्रविण दिक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष श्री. विरेंद्र वणजू , शेखर मुकादम , जितेंद्र शिंदे, दिप नाचणकर, सलील डोंगरे उपस्थित होते.