रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. मागच्या 12 तासांपासून रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो.
या घाटात दरड कोसळण्याची 15 दिवसातील तिसरी घटना समोर आली आहे. मलबा हटवण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. तसंच वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रतत्न केले जात आहेत. रघुवीर घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. आताही अशीच दरड कोसळली आहे. मलबा हटवण्याचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. तसंच वाहतूक पुर्ववत करण्यासाठी प्रतत्न केले जात आहेत. दरड कोसळण्याच्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे. तिथेच दरड कोसळली आहे.