मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला वडील ओरडले आणि मुलीने उचलले टोकाचे पाऊल…

रत्नागिरीः– मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलीला वडील ओरडले. याच रागातून सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील १५ वर्षीय विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर मोहल्ल्यात खळबळ उडाली. आत्महत्येची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

सोमेश्वर मुस्लिम मोहल्ला येथील मारिया आजिम दाऊद ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेते. ऑनलाईन अभ्यासक्रम शिकण्यासाठी ती घरातील मोबाईल वापरत होती. केवळ ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल वापरायचा अशी सक्त ताकीद तिच्या वडीलांनी दिली होती. तरीहि मंगळवारी मारिया मोबाईलवर गेम खेळताना वडीलांना दिसली. यापुढे मोबाईलवर गेम खेळू नको असे सांगत त्यांनी तिला दम भरला होता.

वडील ओरडल्याच्या रागातून मारियाने रात्रीच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी घरातील नातेवाईक उठल्यानंतर मारियाचा शोध घेण्यात आला. यावेळी एका खोलीत गळफास लावल्याच्या स्थितीत आढळून आली.