रत्नागिरी:- मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेला वृध्द कारने धडक दिल्यामुळे गंभिर जखमी झाला. या वृद्धाचा उपचारा दरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची घटना सोमवार 12 सप्टेंबर रोजी पहाटे 5.30 वा.सुमारास जिल्हा परिषद समोर रस्त्यावर घडली.
अनिल रघुनाथ नलावडे (65, रा.शिवसंमृध्दी अपार्टमेंट जेल रोड,रत्नागिरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. सोमवारी पहाटे नेहमी प्रमाणे ते चालण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. जिल्हा परिषदे समोरील चढावात ते आले असता कार चालक नजबुल कमलदराज खान (32, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) याचा त्याच्या ताब्यातील कार (एमएच- 04- एचएक्स- 2101) वरील ताबा सूटला आणि कारने त्यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.









