रत्नागिरी:- निवळी-हातखंबा येथील एका मेसमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील कामागाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना बुधवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.45 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
गज्जू राममिलन कोल (39, मुळ रा.जि.रिवा मध्यप्रदेश सध्या रा.निवळी-हातखंबा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत योगेशकुमार बिपिनचंद्र समदानी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, गज्जू कोल हा निवळी-हातखंबा येथील रवि इंन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडच्या मेसमध्ये कामाला होता. बुधवारी सकाळी गज्जू कोल हा नेहमीप्रमाणे सकाळी उठून मेसचे काम करत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









