रत्नागिरी:- मद्याच्या नशेत मुरुगवाडा येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असरार अस्लम मस्तान (वय २६, रा. मालगुंडकर चाळ, मुरुगवाडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांचा भाऊ असरार मस्तान याची पत्नी त्याच्यासोबत रहात नाही. या तणावमुळे मद्याच्या नशेत घराच्या किचन रुमच्या दरवाजाची आतून कडी लावून साडीने गळ्यात घेऊन आत्महत्या केली. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.









