मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामात नव्याने ९२ कोटींची निविदा

रत्नागिरी:- मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महमार्गाच्या कामाला दोन वर्षे पुर्ण झाली. तरी अजून काम अपुर्ण आहे. आता शासनाने पुन्हा मार्च २०२६ पर्यंत ठेकेदार कंपनीला मुदत वाढ दिली आहे. ८६८ कोटीचा सुमारे ५६ किमीचा हा रत्नागिरी ते आंबा असा टप्पा आहे. परंतु आता या कामामध्ये नव्याने ९२ कोटीची निविदा काढण्यात आली आहे. मग मुळ कामात आताची कामं का समाविष्ट करण्यात आली नाही. महामार्गाचे काम का रेंगाळले आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मिऱ्या नागपूर महामार्गाचे गेल्या दोन वर्षांमध्ये ५६ किमीपैकी ४२ किमी डाब्या बाजुचे कॉंक्रिटीकरण झाले आहे तर ४४ किमी दोन्ही बाजुने कॉंक्रिटिकरण पूर्ण झाल्याचे कंपनीकडुन सांगण्यात आले. या टप्प्याची पुर्ण निविदा ९३० कोटींची होती. परंतु या मार्गावर तेवढी वाहतुक नसल्यामुळे ती कमी करून ८६७ कोटी केली. दोन वर्षे झाली तरी ठेकेदार कंपनीकडुन हे काम पुर्ण झालेले नाही. आता कंपनीला शासनाने मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु या दरम्यान ठेकेदार कंपनीने वाढीव कामांसाठी ९२ कोटीची नव्याने निविदा काढली आहे. मग पुर्विच्या कामात ही कामे का समाविष्ट करण्यात आली नाहीत, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नव्याने काढलेल्या ९२ कोटीच्या निविदेमध्ये तीन टप्प्यात कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात शहराजवळील कुवारबाव येथील तीन पदरी सर्व्हिस रोड करण, नाणीज येथील ९ मिटर सर्व्हिस रोड, साखरपा येथील अंडरपास याला ४५ कोटी खर्च केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्पा ११ कोटी ७१ लाखांचा आहे. यामध्ये एमआयडीसीची पाईपलाईन, महावितरणचे पोल, ट्रन्सफॉर्मर, जिल्हा परिषद पाईप लाईन स्थलांतरित खर्च होणार आहेत. तिसरा टप्पा ३० कोटी ३ लाख ४२ हजाराचा आहे. यामध्ये रस्त्यात चौकन उभा करण्यात येणार आहेत. स्टेट बॅंक कॉलणी, गणेश कॉलणी, कुवराबब, महालक्ष्मी मंदिर खेडशी, दख्खन साखरपा याचा समावेश आहे. तसेच कारवांचीवाडी फुट ब्रिज आहेत. तसेच ४ कोटी ६८ लाखाचे साळवी स्टॉप येथील पालिकेची पाईपलाईन स्थलांतरित करण्याच्या कामाचाही समावेश आहे.

कुवारबाव येथे २०० कोटींचा उड्डान पूल प्रस्तावित

ठेकेदार कंपनीने कुवारबाव जवळ प्लाय ओव्हचा नवा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचा आराखडा करण्याचे काम सुरू आहे. सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून हा उड्डान पुल उभारण्यात येणार असल्याचे समजते.