मिरकरवाडा येथे मच्छीमारी बोट बुडाली; खलाशांनी पोहत गाठला किनारा

रत्नागिरी:- नौकेची डागडुजी करण्यासाठी मिरकरवाडा बंदरातून भगवती बंदरात निघालेल्या नौकेचे इंजिन बंद पडून नौका भरकटली. यामध्ये ही नौका खडकावर आदळल्याने नौकेला जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत ३ खलाशांनी नौकेतून समुद्राच्या पाण्यात उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० वा. चे सुमारास भगवती बंदरात घडली.

खराब हवामानामुळे सर्वच नौका विविध बंदरांवर विसावल्या आहेत. त्यातच १ सप्टेंबरपासून पर्ससीननेट मासेमारी सुरु झाली आहे. पावसासह वादळी वारे वहात असल्याने अजूनही काही नौका मिरकरवाडा बंदरात विसावलेल्या आहेत. तर काही नौकांची डागडुजी सुरु आहे. मिरकरवाडा येथील जिक्रीया लतीफ पटेल आणि इतर यांच्या मालकीची बैतुल रिझवान नावाची मासेमारी नौका डागडुजीसाठी जाताना खडकावर आदळून फुटल्याने या नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना घडली.