मालगुंड समुद्रात तिघे बुडाले; दोघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड समुद्रकिनारी आलेले तीन पर्यटक बुडाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेल्या तीनपैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून या घटनेत तुषार शरद दळवी (वय-34) याचा मृत्यू झाला आहे.
 

बुडालेले तिघेजण मुंबई येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. दिवाळी सुट्टीत हे पर्यटक पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे दाखल झाले होते. शनिवारी सकाळी हे तिघेजण मालगुंड समुद्रकिनारी फिरण्या करिता गेले होते. समुद्रात आंघोळी करिता गेले असता तिघेजण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यापैकी शेखर आप्पा राजे(वय-34), अनिमेश त्रिपाठी(वय-25) या दोघांना वाचवण्यात यश आले असून तुषार शरद दळवी याचा मृत्यू झाला आहे.