रत्नागिरी:- बेडरुम मधून बाहेर पडून घराच्या हॉलमध्ये येत असताना अचानक पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
राहुल रमेश साईल (वय ५२, रा. मालगुंड, रत्नागिरी) हे मालगुंड येथे असताना त्यांची पत्नी आदीती साईल हिस आपण जेवण करण्यासाठी जावूया असे बोलून बेडरुम मधून बाहेर पडून घराच्या हॉलमध्ये आले असता पत्नी आदितील पडल्याचा आवाज आला. आत जावून पाहिले असता त्यांचे पती राहूल हे हॉलमध्ये उताणे पडले होते. तात्काळ त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









