मारुती मंदिर येथे घरगुती वादातून महिलेने केले फिनेल प्राशन

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथे नेपाळी महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणातून फिनेल प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मनिषा गोपाळ सुनार (२५ मुळ रा. नेपाळ सध्या रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) असे फिनेल प्राशन केलेल्या नेपाळी महिलेचे नाव आहे.

ही घटना रविवारी (ता. ६) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे तिच्या पतीसोबत कोणत्यातरी अज्ञात कारणातून भांडण झाले होते. त्या रागातून तिने फिनेल प्राशन केले. काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तिच्या पतीने तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असून याबाबत जिल्हा रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.