Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी मांडवी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

मांडवी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील वृद्धाला चक्कर आल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. विष्णू सिताराम वालकर (वय ७५, मुळ: रा. भडे ता. लांजा. सध्या पद्मावती वाटीक, मांडवी रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेसात वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वालकर यांनी सकाळी चहा प्यायल्यानंतर टॉयलेटला जात असताना अचानक त्यांना चक्कर आली. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.