मांडवी येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील प्रौढ महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. सोनाली दीपक पिलणकर (५३, रा. मांडवी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढेचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी ११ वा. सुमारास त्यांना घरी खोकला लागल्याने पती दीपक पिलणकर यांनी तिला मिरकरवाडा येथील डॉ. गणेश कुलकर्णी यांच्याकडे उपचार करून घरी आणले. त्यांना रात्री ८.३० वा. सोनाली यांना अचानक चक्कर आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्या पतीने त्यांना खासगी दवाखान्यात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.