मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष; रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक

रत्नागिरी:- मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर रत्नागिरी जिल्हापरिषाद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजपा हे महायुतीचे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. आज पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे भाजपाचे जिल्हा निवडणुक प्रभारी ऍड. दिपक पटवर्धन यांनी सांगितले.

नगरपरिषादांमधाील विजयानंतर जिल्ह्यात सेना आणि भाजपाच्या विजयी युतीचे सुत्र आता जिल्हापरिषद आणि पंचायतसमीती निवडणुकांसाठीही वापरण्यावर शिक्का मोर्तब या बैठकीत करण्यात आले. दोन्ही पक्षांच्या जागावाटपाचा तपशिल लवकरच देण्यात येईल असेही यावेळी ऍड. पटवर्धन यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यासमवेत , भाजपाचे रविद्र चव्हाणा यांचे स्विय सहाय्यक अनिकेत पटवर्धन, माजी आमदार विनय नातू आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

मात्र महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) या निवडणुकीत महायुतीसोबत असणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार शेखर निकम यांना विचारणा केली असता आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत. असे सांगण्यात आले. यासंदर्भात आमची पालकमंत्र्यांशी चर्चा सुरु असल्याचेही यावेळी निकम योनी सांगितले.