भोस्तेत तिहेरी अपघात प्रकरणी टॅंकर चालकावर गुन्हा

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळणावर झालेल्या तिहेरी अपघातात कारमधील प्रवाशांच्या किरकोळ दुखापतींसह अन्य तीन वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालक राजेश्वर शनप्पा मंगलगी (२६रा. विजापूर, कर्नाटक) याच्यावर रविवारी सायंकाळी उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅंकर घेऊन तो भोस्ते घाट उतरत असताना ट्रकला धडक दिली. या धडकेनंतर ट्रक थेट दरीत कोसळला. मागून येणारी इर्टिगा कार व कंटेनर एकमेकांवर आदळल्याने तिहेरी विचित्र अपघात घडला होता. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक देखील ठप्प झाली होती.