भाजपकडून दक्षिण रत्नागिरी विस्तारित कार्यकारिणीची घोषणा

रत्नागिरीः– भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तारीत कार्यकारणीसह विविध सेल, मोर्चाच्या जिल्हा प्रमुखांची नावांची घोषणा रविवारी माजी राज्यमंत्री आ.रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष अड.दिपक पटवर्धन यांनी केली. भाजपने सर्व सर्व मोर्च्याच्या प्रमुख पदी नव्या चेहर्‍याना संधी दिली आहे.

युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी अनिकेत पटवर्धन, महिला मोर्चा सौ.ऐश्वर्या जठार, अनुसूचित जाती मोर्चा मारुती कांबळे, किसान मोर्चा मिलिंद वैद्य, इतर मागासवर्गीय राजन कापडी, अल्पसंख्याक झाकीर शेखासन यांची प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रकोष्ठ सेल प्रमुखांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून जेष्ठ कार्यकर्ता सेल विजय पेडणेकर, उद्योग आघाडी मुकुंद जोशी, वैद्यकिय सेल डॉ. अभय धुळप, सहसंयोजक डॉ.संतोष बेडेकर, कायदा सेल अड.विजय साखळकर, शिक्षण सेल आनंद शेलार, मच्छिमार सेल दामोदर लोकरे, सोशल मिडीया धनंजय पाथरे, सहकार सेल अनिल कनगुटकर, प्रज्ञा सेल प्रभाकर केतकर, सांस्कृतिक सेल सौ.मुग्धा भट-सामंत यांचा समावेश आहे.

विस्तारित जिल्हा कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष अड.अशोक कदम, सौ.रश्मी कदम, विजय सालीम, रविंद्र नागरेकर, हरीभाई पटेल, सुयकांत साळुंखे, दिपीका जोशी, सौ.स्वाती राजवाडे, भास्कर सुतार, विकास सावंत, सरचिटणीस- राजेश सावंत, यशवंत वाकडे, सचिन वहाळकर, कोषाध्यक्ष सौ.मुग्धा केदार करंबेळकर, सचिव -सौ.स्नेहा चव्हाण, सौ.शितल गोठणकर, अड.महेंद्र मांडवकर, प्रशांत डिंगणकर, रविकांत रुमडे, हर्षल लेले, विष्णु पवार, सौ.पल्लवी पाटील, विनय मलुष्टे, राजेश मयेकर, सुहास उर्फ राजू भाटलेकर, हेमंत शेट्ये यांची निवड करण्यात आली आहे.