रत्नागिरी:- तालुक्यातील चांदोर-तळेवाडी येथील खलाशी बोटीवर जेवण बनवत असताना गॅसचा भडका उडून ४० टक्के भाजला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार करुन त्यांना सोडण्यात आले होते. पुन्हा तब्बेत ढासळल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष कृष्णा फुटक (वय ४०, रा. चांदोर तळेवाडी, रत्नागिरी) असे मृत खलाश्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ५) सप्टेंबरला सकाळी बोटीवर घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष फुटक हे बोटीवर जेवण बनवत असताना अचानक गॅसचा भडका उडून त्यात ते ४० टक्के भाजले होते. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डिस्चार्ज घेऊन गेल्यानंतर त्यांनी तब्बेत पुन्हा ढासळली पुन्हा उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.









