बैलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावरील बैलाच्या मृत्यूस आणि वासराच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.40 वा. पूर्वी चंपक मैदान येथील रस्त्यावर घडली आहे.

याबाबत सागर सायबू खेत्री (28, रा.टी.जी.शेट्येनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून रस्त्यावरील दोन गुरांना धडक देत पलायन केले. या धडकेत एका बैलाचा मृत्यू झाला तर एक वासरु जखमी झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.