रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे बेशूध्द अवस्थेत सापडून आलेल्या अज्ञात प्रौढाचा उपचारांदरम्यान बुधवार 17 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वा.जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.
सोमवार 15 एप्रिल रोजी रेल्वे पोलिसांना रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर अज्ञात प्रौढ बेशुध्द अवस्थेत पडलेला दिूसन आला होता. रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्या प्रौढावर उपचार सुरु असताना बुधवार 17 एप्रिल रोजी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









