सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बारसूबाबतची घोषणा
राजापूर:- कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.तरी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बारसू रिफायनरीला विरोध होत असताना मोठी घोषणा केली आहे. त्यांनी रत्नागिरीतील बारसू रिफायनरी ही ६२ कातळशिल्प वगळून केली जाईल. तर १७ कातळ शिल्पांच्या संवर्धनासाठी देखील निविदा काढल्या जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता रखडलेला बारसू रिफायनरी प्रकल्प पुढे जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , रत्नागिरी जिल्ह्यात बारसू या गावात प्रस्तावित रिफायनरी होणार असून त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. नाणारमध्ये होणारी रिफायनरीसाठी ही बारसू, सोलगाव, धोपेश्वर, गोवळ, शिवणे-खुर्द, देवाचे गोठणे या गावांच्या मध्ये हलविण्यात येणार आहे. तर येथे त्यासाठी 6200 एकर जागा लागणार असून 2900 एकर जमिन देण्यास लोकांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतर यावरून लोकांच्या जनप्रक्षोभ उसळला होता. यानंतर आतापर्यंत प्रशासनाला तोडगा काढला आलेला नाही. याचदरम्यान आता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणेने पुन्हा एकदा हा वाद उफाळण्याची शक्यता उद्भवली आहे. दरम्यान याबाबत मुनगंटीवार यांनी अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नावर लेखी उत्तर दिलं आहे. त्यामुध्ये याचा खुलासा झाला आहे.
दरम्यान या परिसरातील ग्रामस्थांना आपल्या जागा या प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीत. आमच्या येथील आंबा, मच्छी व्यवसाय, शेती हे सगळेच या प्रकल्पामुळे नष्ट होईल. हा प्रकल्प प्रदूषण करणारा आहे. त्यामुळे कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पाने बाधा पोहोचेल. त्यामुळे आमचा पारंपरिक शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आंबा काजूच्या बागा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करत येथील ग्रामस्थांनी नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे.