बापरे; जिल्ह्यात 222 नवे रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. मागील 24 तासात तब्बल 222 नवे रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 5985 झाली आहे. 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये तब्बल 162 अँटिजेन टेस्ट केलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तर 60 आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आहेत. रत्नागिरी तालुक्यात मागील 24 तासात 98 रुग्ण सापडले आहेत. याशिवाय चिपळूण 63, गुहागर 21, खेड 11, दापोली 1, संगमेश्वर 4, लांजा 8 तर राजापूर तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत.