रत्नागिरी:- रत्नागिरी बाजारपेठेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतीच आहे. सहाव्या दिवशी 32 जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी पाचजण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या वर पोचली आहे.
पहिल्याच दिवशी 75 जणांची तपासणी करण्यात आली यातून बाजारपेठेत तब्बल 9 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दुसऱ्या दिवशी 31 जणांपैकी 8, तिसऱ्या दिवशी 60 पैकी तब्बल 12 तर 6 सप्टेंबर ला 60 तपासण्या करण्यात आल्या. यातील 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. पाचव्या दिवशी 43 जणांची तपासणी करण्यात आली यात 8 पॉझिटिव्ह सापडले होते. मंगळवारी सहाव्या दिवशी 32 जणांची तपासणी करण्यात आली असून यात 5 नवे रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे बाजारपेठेत सहा दिवसात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येने 50 चा आकडा गाठला आहे.









