बहुजन समाजाच्या न्यायासाठी उद्या बविआचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

रत्नागिरी:- बहुजन समाजाला न्याय हक्कापासून वंचित ठेवणे हे राजकिय लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठरवून केलेले षडयंत्र आहे. या विरोधात उद्या सोमवार 21 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बहुजन विकास आघाडीतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे असे बविआचे जिल्हाप्रमुख तानाजी कुळ्ये यांनी सांगितले.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजही राज्यघटनेतील तरतुदीनुसार प्रत्येक माणसाला सामाजिक, आर्थिक, राजकिय, शैक्षणिक, आरोग्य, जाती समानतेचा हक्क आणि अधिकार मिळालेले नाहीत. ओबीसी ची जातनिहाय जणगणना, घर बांधणी व दुरुस्तीचे अधिकार ग्रामपंचायतीना प्रदान करा, लॉकडाऊन कालावधीतीत भरमसाठ आलेली विजबील रद करा. लोकनेते शामरावजी पेजे आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करा, कोरोना कालावधीतील आमदारांचे मासिक मानधन व भत्ते रद्द करणे, बेदखल कुळवहिवाटदारांना न्याय मिळावा, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्त पदांची त्वरित भरती करणे, शहरी व ग्रामीण भागातील बससेवा त्वरित चालू करा, इंधन दरवाढ कमी करा, 90 जिल्ह्यातील सर्व सेतु कार्यालये चालू करणे, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता लागू करा, शेतकर्‍यांच्या शेतावर जावून पिक पहाणी नोंदी झालीच पाहीजे, कोरोना संक्रमण काळ हा राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन शासकिय कुटुंब सोडून प्रति कुटुंबाला प्रती महिना भत्ता द्या अशा अनेक मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले जाणार आहे.