रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदीकाळ सुरू असताना समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या दोन नौका सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी पकडल्या आहेत . यातील एक पर्ससीन आणि दुसरी मिनी पर्ससीन नौका आहे .
पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून सुरू झाली आहे . या बंदीकाळात यांत्रिकी नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी आहे . तरीही १ जूननंतर पावसाळी मासेमारी करण्यास गेलेल्या दोन नौकांना पकडण्यात आले असल्याचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी सांगितले . यातील एक नौका मिरकरवाड्यातील असून , दुसरी फणसोपची आहे . यातील एका नौकेचे नाव अरहान , तर दुसऱ्या नौकेचे नाव आयशा असे आहे . सुधारित सागरी मासेमारी कायद्यानुसार , अवैध मासेमारी करणाऱ्या नौका मालकांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे .









