बंदररोड येथे जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या पुतण्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील भागेश्वर मंदिर-बंदररोड येथे फिर्यादींच्या जमिनीवरअतिक्रमण करुन चिऱ्याची भिंतीचे कंपाऊंड करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत प्रदीप कीर (वय ३८, रा. सदनिका क्र. १७.४ था मजला, भागीर्थी सदन, सावरकर रोड, शिपाजी पार्क मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २६ मार्च २०२५ ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अंकुर अनंत कीर (वय ७३, सध्या रा. मनमाला टॅंक रोड स्टार सिटी सिनेमाजवळ, मांटूंगा मुंबई, मुळ ः सोहम व्हॅली अपार्टमेंट, लॅण्डमार्क हॉटेल मागे, रत्नागिरी) यांच्या मालकीच्या फ्लॅांट क्र-२७/१ब या जमिनीवर त्यांचा पुतण्या संशयित अभिजीत कीर याने अंकुर किर यांच्या जमिनीत अनधिकृत प्रवेश करुन जमिनीवर ताबा घेण्याचे हेतूने अतिक्रमण करुन चिऱ्याची भिंतीचे कंपाऊंड केले तसेच फिर्यादी यांना दमदाटी केली. या प्रकरणी फिर्यादी अंकुर कीर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी जमिन हडपणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.