Thursday, June 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी पोमेंडी खुर्द येथे आंब्याच्या झाडावरुन पडून तरुण जखमी

पोमेंडी खुर्द येथे आंब्याच्या झाडावरुन पडून तरुण जखमी

रत्नागिरी:- उत्तर प्रदेश येथील तरुण हापूस आंबा बागेतील झाडावरुन पडला. जखमी तरुणाला अधिक उपचारासाठी त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मंगळवारी (१०) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरेशकुमार (वय २६, सध्या रा. पोमेंडी खुर्द, रत्नागिरी मुळ ः उत्तर प्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठच्या सुमारास पोमेंडी खुर्द येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेशकुमार हा रमाकांत मयेकर (रा. पोमेंडी खुर्द) यांच्याकडे कामाला होता. सकाळी तो हापूस आंबा कलमांची फांदी हलवत असताना अचानक पाय घसरुन खाली पडला. त्याच्या हाताला व डोक्याला मार लागला. उपचारासाठी त्याला तात्काळ कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तेथून उपचार करुन पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.