चिपळूण:-गेल्या काही दिवसांपासून पावसाने पारंभ केला असतानाच सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील पेंढाबे याठिकाणी एका घरावर वीज कोसळून तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली.
मनिषा अनंत कदम यांच्या घरावर ही वीज कोसळली असून यात साक्षी अनंत कदम (15), सावरी सुभाष गमरे (15), विजय काशिनाथ गमरे (30) अशी जमखी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी तालुक्यात 23.50 मि. मि. इतका पाऊस पडला आहे.