Friday, July 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम; आज जिल्ह्याला यलो अलर्ट

पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा मुक्काम; आज जिल्ह्याला यलो अलर्ट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला सलग तीन दिवस पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. जिल्ह्यात दिवसा पावसाची विश्रांती आणि रात्रीत मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 470 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी 23 आणि 24 जुलै रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस चिपळूण आणि खेड तालुक्यात झाला आहे, तर सर्वात कमी पावसाची नोंद रत्नागिरी शहर आणि तालुक्यात झाली आहे. खेड येथील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीवर वाहते आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास नद्या ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, शेतातील भात लावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. बुधवारी दिवसभर कधी उन्ह तर कधी पाऊस असा खेळ सुरू होता; मात्र सायंकाळी पाचनंतर जिल्हाभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला. मागील 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात 470 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.