रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जंगली झाडांच्या आडोशाला मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. दिनेश यशवंत शिंदे (वय ४९, रा. गोडबोलेवाडी, पावस, रत्नागिरी) असे मद्यपान करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी साडेचारच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक रस्त्यावर जंगली झाडांच्या आडोशाला मद्यपान करत असताना आढळला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रद्धा करळकर यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









