रत्नागिरी:- तालुक्यातील मावळंगे ते पावस जाणार्या रस्त्यावरील उतारात दुचाकि घसरुन झालेल्या अपघातात दुचाकिवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वा.घडली होती.अपघातात गंभिर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अपघाताची नोंद पूर्णगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पुजा अजय शिवलकर (48,रा.भाट्ये खोतवाडी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत त्यांचा दिर व दुचाकि चालक अक्षय अजय शिवलकर (26, रा.भाट्ये खोतवाडी,रत्नागिरी) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानूसार, मंगळवारी सकाळी अक्षय आपल्या ताब्यातील दुचाकिवरुन वहिनी पुजाला सोबत घेउन पावस ते मावळंगे असा जात होता. त्यावेळी तेथील उतारात दुचाकि घसरल्याने पुजा या दुचाकिवरुन खाली रस्त्यावर फेकल्या गेल्या.यात त्यांना गंभिर दुखापत झाल्याने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारांदरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार कदम करत आहेत.









