Tuesday, June 2, 2026
spot_img
Home रत्नागिरी परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरले;
कर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धाव

रत्नागिरी:- रत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. बघता बघता आगीने मोठे रूप धारण केले. आगीने डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोण निर्माण झाल्याने डायलिसिस विभागातील अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले. सुरुवातीला आग छोटी असताना आगीवर नियंत्रण न मिळवल्याने आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. येथील रुग्णाला कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले. आग आटोक्यात आणण्यासाठी रनप च्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले.

५७ रुग्णांना सुरक्षित हलवले; ७ आयसीयू रुग्णही सुखरूप

दुर्घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकूण ५७ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये अत्यंत गंभीर अशा ७ रुग्णांचा समावेश होता, जे आयसीयूमध्ये दाखल होते. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलत सर्वच्या सर्व ५७रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे हलवले. सुदैवाने, या धावपळीत आणि आगीच्या घटनेत कोणत्याही रुग्णाला दुखापत किंवा इजा झालेली नाही, अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.