Tuesday, September 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी नोव्हेंबर महिन्यात कोरेकडून 2 कोटी 33 लाखांचा दंड वसूल

नोव्हेंबर महिन्यात कोरेकडून 2 कोटी 33 लाखांचा दंड वसूल

रत्नागिरी:- कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ने तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करून विनातिकीट प्रवाशांवर कठोर कारवाई केली आहे. सुरक्षित आणि जबाबदार प्रवासाला प्राधान्य देत, रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी वाढवली आहे. त्या परिणाम गेल्या नोव्हेंबर महिन्यात 42,965 अनधिकृत प्रवाशांकडून 2.33 कोटी दंड वसूल करण्यात आला.

कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करा. योग्य तिकीटाशिवाय प्रवास करणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. ााालू हिवाळा, ख्रिसमस आणि सणांच्या काळात, अधिकृत प्रवाशांसाठी सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी केआरसीएल संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये, कोकण रेल्वेने 1,070 विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. त्यामध्ये 42,965 अनधिकृत/अनियमित प्रवासी तपासणीसांया काटय़ात सापडले. त्यांयाकडून रेल्वे भाडे आणि दंड म्हणून एकूण 2.33 कोटी रुपये वसूल करण्यात आले. तर गेल्या जानेवारी ते नोव्हेंबर 2025 पर्यंत, एकूण 7,483 विशेष मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये 2,90,786 अनधिकृत/अनियमित प्रवासी आढळले. या कालावधीत देय रेल्वे भाडे आणि दंड म्हणून 17.83 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.