निवळी येथे ट्रक शेडमध्ये घुसला; चालक गंभीर

रत्नागिरी:- मुंबई गोवा माहामार्गावर निवळी-बोबलेवाडी येथे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक एका शेडमध्ये घुसला. या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने शेडमध्ये कोणी नसल्याने जिवीत हानी टळली. ही घटना शनिवारी (ता. १९) दुपारी बाराच्या सुमारास निवळी-बोबलेवाडी रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱा ट्रक (क्र. एमएच-४५ एइ ४५४७) वरिल चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक निवळी-बोंबलेवाडी येथील रस्त्यालगत असणाऱ्या एका शेडमध्ये घुसला. या धडकेत शेडचा बांधही फुटला. या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने शेडमध्ये अपघाताच्या वेळी कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.