Tuesday, July 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवळी-बाईतवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा

निवळी-बाईतवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी-बाईतवाडी रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयवंत जनार्दन रेवाळे (वय ४२, रा. तळेकांटे- रेवाळेवाडी, ता. संगमेश्वर) व शशिकांत विष्णू पवार (वय ३८, रा. निवळी बावनदी, रत्नागिरी) अशी संशयित मद्यपान करणाऱ्यांची नावे आहे. ही घटना रविवारी (ता. १२) रात्री आठच्या सुमारास निवळी-बाईतवाडी रस्त्यावर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित जयवंत रेवाळे व शशिकांत पवार हे दोघे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळून आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे व लक्ष्मण कोकरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.