निवखोलातील ‘त्या’ शिक्षिकेची होणार बदली

शिक्षकेविरोधात विद्यार्थ्यांना दमदाटी व भेदभाव करत असल्याची तक्रार

रत्नागिरी:- शहरातील पालिकेच्या निवखोल शाळेत विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेले दोन दिवस विद्यार्थीविना शाळा सुरू आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात, दमदाटी करतात, असा पालकांचा आक्षेप आहे. त्या शिक्षकाला बदलल्याशिवाय मुलांना शाळेत पाठवणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

शाळेविषयी तक्रार आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी एस. जे. मुरकुटे यांनी स्वतः पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना अहवाल दिला आहे. नागरिकांचा रोष लक्षात घेता या शिक्षिकेची अन्यत्र बदली करण्यात येणार आहे.

“निवखोल शाळेविषयी माझ्याकडे अहवाल आला आहे. त्यामध्ये पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षिकेविषयी पालकांचा विरोध आहे. यात मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी या शिक्षिकेची बदली अन्यत्र करण्यात येणार आहे. गुरुवारी याची अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्याधिकारी वैभव गारवे म्हणाले.

पालकांच्या म्हणण्यानुसार शिक्षिका काही विद्यार्थ्यांना विशेष वागणूक देतात, तर इतरांना भेदभाव करतात. त्यांना दमदाटी करतात. त्यामुळे मुलं घाबरलेली आहेत. काही पालकांनी गुरुवारीपासून मुलांना शाळेत पाठवणे पूर्णपणे थांबवले आहे.

शिक्षिका बदलली जात नाहीत, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, असे स्पष्ट मत पालकांनी घेतले आहे. पालकांच्या तक्रारीवर शिक्षण विभागाने प्रशासकीय अधिकारी मुरकुटे यांच्यामार्फत चौकशी केली. त्यांनी अहवाल मुख्याधिकार्‍यांना दिला. त्यानंतर संबंधित शिक्षिकेला बदलण्यात येईल का, यावर अजून निर्णय झालेला नाही.

शाळेतील वातावरण सध्या तणावाचे आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिक्षिका बदलत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, असा पालकांचा पुनरुच्चार आहे.