Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी निरुळ सडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

निरुळ सडा येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ सडा येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. सुनिल गणपत चव्हाण (वय ५२, रा. नाखरे-बोरभाटले, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) सायंकाळी सातच्या सुमारास निरुळ फाटा येथे पायवाटेवर निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिल चव्हाण हे सकाळी साडेआठच्या सुमारास कोळंबे येथे कामाकरिता घरातून निघून गेले होते. परत न आल्याने शोध घेतला असता ते निरुळ-सडा येथील पायवाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.