खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणवलीसह सिंधुदुर्गला थांबा
रत्नागिरी:- नागपूर-मडगाव अशी साप्ताहिक स्पेशल गाडी कोकण रेल्वेेेमार्गेे पुढील वर्षीच्या 2 जानेवारीर्पंत धावणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार नागपूर मडगाव मार्गावर धावणारी साप्ताहिक विशेष गाडी (01235/36) ही नागपूरहून ही गाडी दि. 4 डिसेंबर 2020 ते 1 जानेवारी 2020 कालावधीत दर शुक्रवारी सांकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 4 वा. 40 मिनिटांनी गोवा मडगावला पोहचेल. परतीच प्रवासात ही गाडी 5 डिसेंबर ते 2 जानेवारी 2021 कालावधीत दर शुक्रवारी सांकाळी 7 वा. 40 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी नागपूरला ती रात्री 8.30 वाजता पोहचेल.
ही गाडी वातानुकूलित, शयनयान तसेच सेकंड सीटींग अशा एकूण 22 कोचसह धावणार आहे. ही गाडी संपूर्ण प्रवासात वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कलण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी स्थानकांवर थांबणार आहे.








